Description
माझ्या सगळ्याच पुस्तकांप्रमाणे याही पुस्तकात मला नैराश्याचा इतिहास, नैराश्याची लक्षणं, निदान पद्धती आणि उपचार पद्धती या सगळ्यांबद्दल लिहायचं होतंच; पण याशिवाय आणखीही काही गोष्टी मला लिहायच्या होत्या उदा. अनेक प्रसिद्ध माणसांना नैराश्य येऊन गेलं; त्यातून काही बाहेर पडले; पण अनेकांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या जीवनकहाण्या मला सांगायच्या होत्या. त्यांच्यापैकी काहींबद्दल मी पूर्वी लिहिलं होतं, काहींबद्दल मी बरंच वाचलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही दशकांमध्ये आलेला चंगळवाद, ग्लोबलायझेशन, निओलिबरानिझम आणि सामाजिक व्यवस्था यांमुळे बदललेली जीवनशैली या सगळ्यांमुळे नैराश्य आणि इतर मानसिक विकार कसे निर्माण होतात आणि एकंदरच नैराश्य हा कुणा एका व्यक्तीला होणारा त्या व्यक्तीपुरता आजार नसतो तर तो सगळ्याच समाजाचा विकार असतो आणि तो आर्थिक, राजकीय आणि इतरही सगळ्या परिस्थितीचा हा आरसा असतो. त्यामुळे ‘पोट बिघडलंय, रात्री अमुक – तमुक चूर्ण घ्या आणि सकाळी बरे व्हा’ अशा वरवरच्या गोष्टींपेक्षा नैराश्याची कारणं आणि परिणाम यांचं दृष्टचक्र हे जगद्व्यापी कसं आहे हे मला यातून सांगायचं आहे.
आज जागतिक पातळीवर चालणाऱ्या चंगळवाद, ऑब्सोलेसन्स आणि व्यापारीकरण आणि त्यांचा मनोविकारांशी असलेला संबंध दाखवणारं एक प्रकरण आम्ही यात घातलं आहे. या प्रकरणामुळे नैराश्याची व्याप्ती आणि गांभीर्य सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं.
हे पुस्तक मानसशास्त्राचं आणि एकूणच अनेक विषयाचं कुतूहल असणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक, समुपदेशक आणि नैराश्याशी लढणाऱ्या अनेक रुग्णांना उपयोगी पडेल.
Reviews
There are no reviews yet.