Description
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहेत. त्यांनी हरप्पा संस्कृतीविषयी आकलनात्मक संशोधन करण्याच्या उद्देशाने जो अभ्यास केला, त्याची निष्पत्ती म्हणजे हे पुस्तक होय. महाराष्ट्राची जडणघडण प्रामुख्याने देवगिरीच्या यादवांच्या काळात झाली असली, तरी त्याची पायाभरणी सातवाहन काळापासून चालू होती. हरप्पा जन आणि ब्राह्मणी व्यवस्थेने ज्यांना व्रात्य क्षत्रिय म्हणून धिक्कारले तो वृज्जी गण या दोहोंचे सांस्कृतिक वारसदारच महाराष्ट्राच्या जडणघडणीत कारणीभूत आहेत, हा या लेखनाचा प्रमुख निष्कर्ष आहे.
या लेखनासाठी वैविध्यपूर्ण साधने लेखकाने हाताळली असून ती मिळविण्यासाठी व असंख्य मंदिरांना भेटी देण्यासाठी भरपूर प्रवासही केला आहे. लेखन स्वतः इंजिनिअर असल्याने गोळा केलेल्या साधनांचे त्याने शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून साधनांचा अन्वयार्थ लावलेला आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीची जडणघडण कशी झाली व तिचे मूळ स्वरूप काय होते, याबाबत नवीन दृष्टी देणारे हे संशोधन आहे.

Reviews
There are no reviews yet.