नवभारत

270.00

1 in stock

पुस्तकाचे नाव नवभारत
लेखक --
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २३२
आकार ६ * ९ इंच
वजन ७६१ ग्रॅम

Description

जुन्या मराठी हस्तलिखितांच्या अभ्यास-परंपरेपासून ते विज्ञानकथांच्या कल्पज वाङ्मयापर्यंत, वाङ्‌मयाच्या इतिहासापासून ते संकल्पनात्मक आकलनापर्यंत, परंपरा आणि नवतांपासून ते परंपराविस्ताराच्या समकालीन स्पष्टीकरणापर्यंत, बालशिक्षणापासून ते कोशकार्यापर्यंत अशी बहुविध विषयक्षेत्रे या अंकाच्या निमित्ताने लेखांच्या टप्प्यात आणता आली असली तरी कालमर्यादच्या कारणामुळे – अनेक महत्त्वाच्या लेखकांचा आणि लेखनाचा समावेश होऊ शकला नाही याची खेदयुक्त जाणीव आम्हाला आहे. तरीही आकांक्षाप्रवण आणि अपेक्षाभिमुख वर्गाच्या विचारांचे आणि भाषेचे तपशील पुरेश्या प्रमाणात या अंकात उमटले आहेत असे आम्हाला वाटते.  त्याचप्रमाणे, तीन दशकांपूर्वीच्या भाषेचा बाज आणि विचारसमृद्धी काय प्रकारची होती त्याचा प्रत्यय देणारे पुनर्भेटपर लेखनही इथे आल्याने वाचकांच्या मनावर दोन्हीचा ठसा यथोचितपणे उमटेल याची खात्री वाटते.

मराठी भाषा, किंवा कोणतीही भाषा, अभिजात आहे किंवा नाही यापेक्षाही ती कालसुसंगत, अभिव्यक्तीक्षम आणि भाषाभाषांच्या संघर्षात अंतर्बाह्य टिकणारी आहे की नाही? ती समाजातल्या शेवटच्या माणसाला रोजगार आणि तो मागण्यासाठीचा आवाज देते. की नाही? अभिव्यक्तीच्या सगळ्या धारणाना, आकांक्षांना न्याय देते की नाही? कींपासून ते कारागिरांपर्यंतचे हरत-हेचे आवाज तिच्यात उमटू शकतात की नाही? आणि मराठी भाषेकडे-भाषकांकडे ही भाषिक इच्छाशक्ती आहे का? हे प्रश्न आजघडीला जास्त महत्त्वाचे आहेत. इतिहासाच्या एखाद्या टप्प्यावर भाषेच्या इतर अंगांपेक्षा भाषकांची इच्छाशक्ती जास्त महत्त्वाची असते-ठरते. आज आपण एक मराठीभाषक समाज किंवा भाषासमूह म्हणून अशा इच्छाशक्ती पणाला लागण्याच्या निर्णायक टप्प्यावर उभे आहोत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नवभारत”

Your email address will not be published. Required fields are marked *