मायेची झालर

110.00

5 in stock

पुस्तकाचे नाव मायेची झालर
लेखक उर्मिला उमेश खिराडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७० ग्रॅम

Description

महापुरूषांच्या किंवा सत्पुरूषांच्या जीवनाच्या यशस्वीतेच्या मांगे असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण कारण म्हणजे या विभूतींचे असणारे ‘संस्कारक्षम’ जीवन होय.  कारण महानता ही अवगत होत नसून ती संस्कारात भिनलेली असायला हवी आणि या संस्कार शिदोरीचे उगमस्थान म्हणजे बहुतांश वेळा मातृ संस्कार हेच आहेत.  मुल बालवयात प्रचंड ग्रहणक्षम असते त्याला सर्वाधिक सहवास लाभतो तो त्याच्या आईचा आणि मग  साहजिकच आईचं हे संस्कार देणं व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनते व आयुष्यभर ती त्याची ओळख ठरते.  

आई म्हणजे सृजनशीलतेचा साक्षात अविष्कार आहे.  जगातील जवळपास सगळ्यास महान व्यक्तिमत्त्वाचे यशस्वीतांचे आणि गुणवंतांचे हे असे ‘मातृसंस्कारशील’  असणेच पुढे जाऊन त्यांना आयुष्याच्या यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवणारे ठरले आहे. मातृमहिमा हा कालातीत आहे.  माता ही पूज्यनीय, प्रेरणीय व मार्गदर्शनीयच आहे.  ती कोणत्याही परिस्थितीत असली तरी स्वत: पासून वेगळ्या केलेल्या आपल्या काळजाच्या तुकड्याला घडविण्यासाठी जीवाचें रान करते. मातृत्व ही मानवी भावनांशी निगडीत असून त्यास मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण  महत्त्व प्राप्त झालेले आहे.  आई म्हणजे आत्मा आणि ईश्र्वर या दोघांचा संगम होय.   

आईचे खरे प्रेम आणि संस्कार यांची कशाचीही तुलना होऊ शकत नाही.  आई म्हणजे साक्षात परमेश्र्वराची मूर्ती असते.  आईच्या मायेची, प्रेमाची  किंमत आपल्याला कधीच  करता येत नाही. आपल्या  जीवनाला आकार देण्याचे व संस्कारीत करण्याचे महान काम आपल्या आईने केलेले आहे. इतिहास साक्ष आहे या बाबीला की माता ही बालकाचा विकास घडविण्यात मोलाची भूमिका बजावते. बालवायात बिंबले गेलेले हे विचारच महान विभूतींच्या अथांग मौलिक कार्य कर्तृत्त्वरूपी सागराचे उगमस्थान असते. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मी स्वत: कसा आहे या विषयी एक कल्पना असते. व्यक्तीची ही स्वत: विषयीची कल्पना हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू असतो.  हे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे महान कार्य आईच्या माध्यमातून होत असते.

व्यक्तीच्या शारीरिक ठेवणी बरोबरच त्याच्या आवडीनिवडी  क्षमता, कौशल्य, धोरणे, समजूती, नीतिमूल्य, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि स्वाभिमान यांच्या प्रभावातून व्यक्तीचे व्यक्तिमत्व उमलत असते.   aaee वडीलांकडून प्राप्त झालेल्या अनुवंशिकतेच्या पायावरच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची उभारणी त्यास लाभलेल्या समृद्ध किंवा निकृष्ट दर्जाच्या वातावरणात होते. व्यक्तीला लाभलेली सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी ही त्याच्या आईकडून मिळालेल्या व्यक्तिमत्त्व विकासास पोषक ठरत असते. “मायेची झालर ‘ या पुस्तकात महापुरूषांच्या जीवनात आईचे नेमके काय स्थान राहिले आहे.  याचे विवेचन केले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मायेची झालर”

Your email address will not be published. Required fields are marked *