पाली साहित्याचा इतिहास

540.00

1 in stock

पुस्तकाचे नाव पाली साहित्याचा इतिहास
लेखक गणेश वासुदेव तगारे
ISBN 978-81-964553-1-6
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४४२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४६० ग्रॅम

Description

महाराष्ट्राला पाली अध्ययनाची एक उज्ज्वल परंपरा लाभली आहे. प्रा.  धर्मानंद कोसंबी व त्याच्या शिष्यपरंपरेत निर्माण झालेल्या अनेक ज्येष्ठ विद्वानांनी पाली अध्ययनाची पताका सतत फड़कत ठेवली.

ग्रंथाच्या सुरुवातीला प्रा.  तगारे यांनी मध्यकालीन भारतीय आर्यभाषांच्या साहित्याचे विहंगमावलोकन केले आहे.  यात पाली, अर्धमागधी, महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची इत्यादी साहित्यिक प्राकृत भाषांच्या जोडीला अपभ्रंश व उत्कीर्ण लेखांमधील साहित्यिक प्राकृतचा विचार करण्यात आला आहे. प्रा.  तगारे हे स्वत: अपभ्रंशाचे उत्तम जाणकार असल्यामुळे त्यांनी भारतीय साहित्याच्या इतिहासाचा विचार करत असताना अपभ्रंश साहित्याची योग्य ती दखल घेणे आवश्यक असल्याचा मुद्दा विशेषत्वाने मांडला आहे.  यापुढील भागात लेखकाने मध्यकालीन साहित्याचा जातिव्यवस्था, कला यांच्याशी असणारा संबंध स्पष्ट केला आहे. या भागाच्या शेवटी वैज्ञानिक पार्श्वभूमी या सदराखाली मध्यकालीन भारतातील ज्योतिष, गणित व वैद्यक शास्त्रातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच, यात त्यांनी संस्कृत भाषेत आढळणाऱ्या हीनयानी बौद्ध ग्रंथांचा देखील परिचय दिलेला आहे.

त्यामुळे आधुनिक काळात पाली ग्रंथांवर संशोधन करु इच्छिणाऱ्या संशोधकांच्या दृष्टीने हा ग्रंथ म्हणजे एक मार्गदर्शिकाच आहे.

मराठी भाषेची जवळीक असणाऱ्या व इंग्रजीचे फारसे ज्ञान नसणाऱ्या अभ्यासकांसाठी मात्र प्रा. तगारे  यांचे हे पुस्तक अध्ययनाचे उत्तम साधन ठरणार आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाली साहित्याचा इतिहास”

Your email address will not be published. Required fields are marked *