Description
नवशिक्यांसाठी सोपा मार्ग
- २३१०७२ गुणिले ११०६४९ हा गुणाकार करून त्याचे उत्तर तुम्ही एका ओळीत देऊ शकाल का?
- २६२१४४ किंवा ७०४९६९ चे घनमूळ तुम्ही दोन सेकंदात काढू शकाल का ?
- एखाद्या व्यक्तीने न सांगता तुम्ही त्याची जन्म तारीख सांगू शकाल का ?
- एखाद्या व्यक्तीने न सांगता तुम्ही त्याच्या जवळ किती पैसे आहेत हे सांगू शकाल का?
- प्रश्न न सोडवटा तुम्ही त्याचे अंतिम उत्तर सांगू शकाल का ? वा काही विशिष्ट उदाहरणत, प्रश्न न बघताच त्याचे उत्तर सांगू शकाल का?
- वर्ग करणे, वर्गमूळ, घनमूळ आणि अन्य प्रश्न तुम्ही मनातल्या मनात सोडवू शकाल का?
या अशा अनेक गोष्टी, वैदिक गणिताच्या या पुस्तकात दिलेल्या पद्धतीतून सोडवता येतात. विद्यार्थी, व्यावसायिक आणि धंदेवाईक यांना या पद्धती उपयोगी आहेत. वैदिक गणिताच्या या पद्धतीमुळे जगातील लक्षावधी विद्यार्थ्यांची संख्याविषयीची भिती नष्ट होऊन त्यांचे परीक्षेतील मार्क वाढले. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना हा वैदिक गणिताचा मार्ग अत्यंत उत्साहवर्धक वाटला. एमबीए , एमसीए, सीईटी, यूपीएससी, जीआरइ जीमैट वगैरे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रतिपादन केले आहे की वैदिक गणितामुळे त्यांना या परीक्षांमध्ये यश प्राप्त करणे सोपे गेले.
सुप्त गुण
- सहज आणि सुलभपणे समजण्यासाठी प्रत्येक प्रकरणात अनेक सोडवलेली उदाहरणे दिली आहेत.
- विषय चांगल्या प्रकारे समजण्यासाठी अनेक आकृत्या आणि दृश्य परिणाम दिल आहेत.
- जादूचे चौरस, तारीख आणि दिनदर्शिका, अंकांची बेरीज करणे या सारखी विशेष प्रकरणे, स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी दिलेली आहेत.

Reviews
There are no reviews yet.