Description
नैसर्गिक मार्गानं निरोगी राहण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाला उपयोगी पडेल असं व्यापक मार्गदर्शन करणारं पुस्तक.
गेल्या काही वर्षात निसर्गोपचाराच्या लोकप्रियतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पाश्चिमात्य औषधोपचार आणि एलॉपॅथीच्या मर्यादा हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत. ते आता रोगांवर उपचार करण्यासाठी निसर्गोपचारांचा उपयोग करू लागले आहेत.
निरोगी राहण्याचा हक्क हा फ़क्त डॉक्टरांचाच नसून सर्वांचाच तो हक्क आहे हे बाखरूनी आवर्जून सांगितलं आहे. प्रत्येक रोगाची कारणं आणि त्यावरचा उपचार त्या त्यांनी अतिशय सहज आणि सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे.
या पुस्तकांमध्ये डॉ. एच. के. बाखरू यांनी निसर्गोपचाराच्या विविध पद्धतींविषयी आणि त्यांच्या उपयुक्ततेविषयी सविस्तर माहिती दिली आहे. नैसर्गिक अन्नपदार्थ आणि नैसर्गिक घटक, योगा आणि नैसर्गिक नियमांचं पालन केलं तर रोग बरे होऊ शकतात हे त्यांनी वाचकांना सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे. आहारातल्या पौष्टिक घटकांविषयी त्यांनी माहिती दिली आहे.
रोगांवर नैसर्गिक पद्धतीनं उपाय शोधणाऱ्या प्रत्येकाला या पुस्तकाचा लाभ घेता येईल. साधं आणि निरोगी जीवन जगण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असंच आहे. निसर्गोपचार शिकणारे विद्यार्थी आणि निसर्गोपचार डॉक्टर्स यांनासुद्धा या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल.

Reviews
There are no reviews yet.