Description
किल्ले हे ‘राकट -कणखर ‘ अशा महाराष्ट्र -देशांचे वैभव आहे. ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ‘ या ‘आज्ञापत्र ‘ तील एका विधानात मध्ययुगीन दुर्गमहात्म्य प्रकट झाले आहे. मध्ययुगातील कोषागार म्हणून प्रसिद्ध असलेला ‘नारायणगड ‘ किल्ला हे इतिहासप्रेमी, पर्यटकांसाठी प्रेरणास्थान आहे. ‘नारायणगड’ या ग्रंथाच्या रूपाने प्रस्तुत लेखकांनी गडाचा इतिहास उलगडून दाखवला आहे. हि लेखन केवळ छंद जोपासणारे नाही तसेच दुर्गजिज्ञासेला संशोधकीय रूप देऊन हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. त्यांच्या महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा किल्ला जपण्याचा केलेला हा प्रयत्न दुर्गप्रेमींसाठी भूषणावह आहे. प्राथमिक व दुय्यम साधनांच्या भक्कम आधारावर हा ग्रंथ लिहिलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.