स्त्रियांची ओवीगीतं साज आणि स्वरूप

100.00

1 in stock

पुस्तकाचे नाव स्त्रियांची ओवीगीतं साज आणि स्वरूप
लेखक उषा परब
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ३२०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३८० ग्रॅम

Description

स्त्रियांची ओवीगीतं म्हणजे मानवी जीवनानुभवांचे एक अथांग मानससरोवर आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकविसाव्या शतकापासून हे सरोवर आटत जाईल, सुकून जाईल, ही भीती अनाठायी नसावी. ज्या जात्यावर या ओव्या जन्माला आल्या आणि पिढ्यांपिढ्या आळवल्या गेल्या ती जाते संस्कृतीच आता संपली आहे. कृषी संस्कृतीच्या काळात या मौखिक ओव्यांना बहर आला. तरी सुद्धा त्यातल्या काहीच आज उरल्या आहेत. त्या लिखित स्वरुपात राहिल्या नाहीत, की पाठांतराने, घोषरूपाने जतन करण्याची जाणीव पुढच्या पिढीला झाली नाही. जात्याच्या लईवरच या ओव्यांच्या स्वरलहरींचा जन्म झाला आणि अंतही. ज्या भावलहरी वाऱ्यावर उडून गेल्या त्या गेल्यातच. ज्या ऐकणाऱ्याच्या आठवणीत राहिल्या त्या पाठांतरातून टिकल्या. वाहत राहिल्या. त्यातल्या काही कुणाच्या तरी सुरातून कागदावर उतरल्या. त्या तरल्या आणि उरल्या.

एक मात्र खरंय की, स्त्रियांच्या काव्याचा मूळ आरंभ असलेले हे स्त्रीधन पिढी दर पीढी चालत – थांबत – सांडत – संपत जे काही आपल्या होती लागलं आहे ते प्राणपणाने जपणं महत्त्वाचं आहे. प्राकृत भाषेच्या उगमापासून ज्यांनी या ओव्या रचल्या, गायिल्या त्यांचा आज मागमुसही नाही. ही मालन कोण ? कुठच्या गावात राहत असेल ? हिची शेतीभाती, घरदार कुठच्या वेशीत होतं ? हिचा जीवन वृत्तांत काय ? ही कधी होऊन गेली असेल ? उत्सुकता वाढणारे नुसतेच प्रश्न. मालनीच्या ओवीला जैसा भूगोल- इतिहास नाही तशी निश्चित काल संकल्पनाही नाही. फार तर आपण म्हणू ती भूतकाळात होवून गेली, पण तो भूतकाळही संदिग्ध आणि लवचिक स्वरुपाचा असतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्त्रियांची ओवीगीतं साज आणि स्वरूप”

Your email address will not be published. Required fields are marked *