छत्रपती शिवाजी महाराज

100.00

1 in stock

पुस्तकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज
लेखक प्र. न. देशपांडे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या १२०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३९८ ग्रॅम

Description

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये ‘मऱ्हाष्ट्र राज्याची’ स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये झाला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्यांबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली. कारण त्या काळात मराठे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये अत्यंत प्रभावशाली होते. म्हणूनच केवळ महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या कामगिरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मध्ययुगीन राज्यकर्त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या वंशाचे राज्य स्थापन केले नव्हते. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला ‘मऱ्हाष्ट्र राज्य’ असे नामाभिधान होते आणि महाराष्ट्रातील जनता हे राज्य म्हणजे आपले राज्य आहे असे मानत होती. खुद्द शिवाजी महाराजांनी अशी भूमिका होती की हे राज्य रयतेचे असून सर्व जातीधर्माच्या लोकांना, साधुसंतांना आणि महिलांना या राज्यामध्ये सुरक्षितता आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. या ध्येयधोरणासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “छत्रपती शिवाजी महाराज”

Your email address will not be published. Required fields are marked *