Description
मानवी जीवनामध्ये आरोग्य, मन:शांती आणि आत्मविकास यांचा समतोल साधण्यासाठी योग ही एक अत्यंत प्रभावी जीवनपद्धती असून हजारो वर्षांच्या भारतीय ऋषिपरंपरेमध्ये विकसित झालेल्या योगविद्येने आज जागतिक स्तरावर आरोग्यसंवर्धनाचे प्रभावी माध्यम म्हणून मान्यता मिळविली आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुंदर समन्वय साधणारा योग ही आधुनिक समाजासाठी केवल उपचार पद्धती नसून जीवन जगण्याची एक सकारात्मक दिशा आहे. डॉ. राजेंद्रकुमार देवकाते लिखित ‘योग आरोग्यमयी जीवनाची दिशा (सर्वे सन्तु निरामया:)’ हा ग्रंथ योगशास्त्राच्या विविध अंगांचा सर्वसमावेशक परिचय करून देणारा अभ्यासपूर्ण प्रयत्न आहे. योगाच्या मूलभूत संकल्पनांपासून ते दैनंदिन जीवनातील उपयुक्ततेपर्यंतचा प्रवास लेखकाने सुसंगत आणि शास्त्राधिष्ठित पध्दतीने मांडल्यामुळे हा ग्रंथ केवळ माहिती देणारा नसून वाचकाला योगाचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणारा ठरेल.
ग्रंथामध्ये योगाचे तत्त्वज्ञान, अष्टांग योग, योगासने, प्राणायाम, षटकर्म, ध्यान, योगिक आहार, योगचिकित्सा आणि जीवनशैलीशी संबंधित विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक विषयाची मांडणी व्यवहार्य, समतोल आणि समकालीन संदर्भ लक्षात घेऊन केली असल्यामुळे हा ग्रंथ अभ्यासकांसह सर्वसामान्य वाचकांनाही तितकाच उपयुक्त वाटतो. आरोग्यसंपन्न, जागरूक आणि मूल्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी अशा स्वरुपाचे साहित्य निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल.

Reviews
There are no reviews yet.