गंगाधर गाडगीळ : नवकथा प्रणेते

72.00

1 in stock

पुस्तकाचे नाव गंगाधर गाडगीळ : नवकथा प्रणेते
लेखक माधव जोशी
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १४४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

गेल्या ५०-६० वर्षांतील विशेषकरून १९४० ते १९८०-९० पर्यंतच्या काळातील निवडक साहित्यिकांचा परिचय करून देणारी ही पुस्तकमालिका. ह्या साहित्यिकांची ओळख करून देताना त्यावेळचा आपला मराठी समाज, १९४२ ची ‘चले जाव’ चळवळ, स्वातंत्र्यलढा,  १९४७ चे भारताला मिळालेले स्वातंत्र्य, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आशा ऐतिहासिक ठळक घटना आपल्यासमोर ओघाने येतात. तसेच मराठी साहित्यातील नवे प्रवाह; नवकविता, नवकथा, वैचारिक वाङ्मय, विनोदप्रधान साहित्य, वंचितांची अभिव्यक्ती असलेले साहित्य असे विविध प्रवाहदेखील आपल्याला ह्या पुस्तकांतून दिसतात.

परिचयात्मक अशी ही पुस्तके आहेत. त्यांच्या साहित्याची समीक्षा नाही किंवा केवळ त्या साहित्यिकांचे चरित्र नाही. त्यांच्या साहित्याचा हा परिचय आहे. तसेच ह्या लेखकांनी लिहिलेले साहित्याही संक्षिप्तपणे ओळख होण्यासाठी यामध्ये समाविष्ट केले आहे.

गंगाधर गाडगीळांनी मराठी साहित्याला वेगळे वळण दिले. त्या प्रवाहात नवनवीन साहित्यिक पुढे उदयास आले. ह्या पुढच्या साहित्यिकांवर गाडगीळांच्या साहित्याचा सूक्ष्मरीत्या असलेला प्रभाव लक्षणीय आहे. नवकथेचे अध्वर्यु ऐसे उचितरीत्या गंगाधर गाडगीळांचे वर्णन केले जाते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गंगाधर गाडगीळ : नवकथा प्रणेते”

Your email address will not be published. Required fields are marked *