साहित्याचे तर्कशास्त्र

675.00

1 in stock

पुस्तकाचे नाव साहित्याचे तर्कशास्त्र
लेखक लक्ष्मणशास्त्री जोशी, संपादक - सीताराम रायकर, द. दि. पुंडे, पंडित टापरे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४३८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४८० ग्रॅम

Description

कलेचा व नीतीचा संबंध कलेचे तत्त्व लक्षात घेता नीट ध्यानात येईल. नीती हा कलेचा एक विषय आहे, बंधन नाही. नीती-अनीती, ईश्वर-अनिश्वर, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, सौंदर्य-कुरूपता, श्रम-विश्रांती, खेळ, व्यापार इत्यादी मनुष्याच्या भावनांची निर्मिती करणारे व भावनांना क्षुब्ध व शांत करणारे सगळे प्रकार कलेचा विषय बनतात. त्या भावनांच्या अनुकूल-प्रतिकूल संबंधांचा आविष्कार करणे एवढेच कलेचे कार्य आहे.       

सामाजिक विकासाचे प्रतीक, युगप्रवर्तक संघर्षाचा आदर्श आणि जीवनातील किंवा आत्म्यातील सर्व भावनांचा विशद आविष्कार करणारी अशी कला उदयास येण्याच्या अगोदर समाजाच्या विचारामध्ये क्रांती व्हावी लागते. जुनी मुल्ये, जुनी ध्येये, जुन्या संस्था व जुनी शास्त्रे बुद्धीच्या निकषावर तपासून घेण्याची प्रवृत्ती अशा कलेचे सामाजिक अधिष्ठान आहे. आपली प्रवृत्ती अजून अशी संशोधक बनली नाही. अलीकडच्या महायुद्धात धनुष्यबाण व भाले घेऊन यशार्थ लढणे जितके हास्यास्पद आहे तितकेच नव्या जगातील जीवन संग्रामात व संस्कृति संग्रामात जुन्या कल्पना व जुनी मुल्ये व्यर्थ होत. पण हे आपणास अजून नीट समजले नाही. शास्त्रातील व वाङ्मयातील कल्पना ह्या वस्तुस्थितीचा उलगडा करण्याकरिता उत्पन्न होत असतात. परंतु परिस्थिती बदलल्यावर त्या कल्पनांची शुद्धी करावी लागते. कारण नव्या परिस्थितीचा अर्थ कळावयास नव्या कल्पना बनवाव्या लागतात. आपण निरुपयोगी झालेल्या व विचारांत गोंधळ माजविणाऱ्या कल्पनांना शुकनालिकान्यायाने सारखे चिकटून बसलो आहोत. आपले वाङ्मय, आपली कला, आपली शास्त्रे, आपल्या राजकारणी व समाजकारणी संस्था जुन्या संस्कृतीच्या व्यर्थ अभिमानाने भारल्या गेल्या आहेत. पवित्र मानलेल्या वस्तु आता अपावित्र्य निर्माण करत असतील तर त्या फेकावयास पाहिजेत.   

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साहित्याचे तर्कशास्त्र”

Your email address will not be published. Required fields are marked *