Description
मानवी जीवनातील पराकोटीचा उत्साह, धडाडी आणि कार्यक्षमतेचा कालखंडाचेच दूसरे नाव युवाकाळ. तेवढ्याच अत्युच्च कोटीची अनुभवविषयक संवेदनशीलता आणि जिज्ञासा याच कालखंडाची वैशिष्ट्ये. एरवी क्षुल्लक वाटणाऱ्या दैनंदिन अनुभवांमागील कारणांपासून ते अनंत अवकाशापर्यंत आणि स्वत:चे शरीर, आजार, उपचार येथपासून ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीपर्यंत पोहोचलेल्या अशा जिज्ञासांचे त्या वयोगटाला अनुरूप पातळीवर समाधान करणे सोपे नाही. निव्वळ तांत्रिक माहिती ते रुक्ष स्वरूप टाळून अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान यांचे दर्शन देणारा, जिज्ञासापूर्तीबरोबरच अधिक जिज्ञासा जागृतीकडे नेणारा संग्राह्य आणि वाचनीय अनुभव युवा विज्ञान कुतूहल !

Reviews
There are no reviews yet.