Description
पुणे आणि पेशवाई! महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले भूत म्हणजे चित्पावन पेशवाई आणि या भुताचा भूतखाना म्हणजे पुणे! पेशवाई ओंकारेश्वरवर कधीच गेली असली तरी तिच्या कोळशाच्या वैभवाची स्मारके पुणेकर चित्पावन आपल्या बुद्धिवैभवात अजूनही वरचेवर घटवीत असतात. पुण्यास चाललेल्या नानाविध चळवळी केवळ वर्तमानपत्री डांगोऱ्यातून ऐकणाऱ्यांना किंवा वरवर पाहणाऱ्या बावळटांना असे वाटते. की ही पुणेरी भटमंडळी देशासाठी अगदी जीव द्यायला उठलेली आहेत. केवढे त्यांचे गिरसप्पी वक्तृत्व, काय त्यांचे शिक्षणप्रयत्न, काय त्यांची ती धडापासरी साप्ताहिके, दैनिके आणि मासिके, केवढाल्या त्यांच्या राष्ट्रीय संस्था, किती लांबरूंद त्यांचे रिपोर्ट, केवढे मोठमोठे त्यांचे राष्ट्रीय फंड, राष्ट्रीय पुरूष आणि राष्ट्रीय पुतळे! सगळेच पेशव्यांच्या पगड़ीसारखे अचाट आणि अफाट! एखाद्या विधवा भटणीची घाणेरडी खानावळ असली तरी तिचे नाव केवढे मोठे अगडबंब! अखिल भारतीय मानवजीवन संरक्षक सार्वजनिक अन्नपूर्णा कल्पतरू सदन’ असल्या मालगाडी वजा नावाचे

Reviews
There are no reviews yet.