Description
मोडीच्या प्राक्तनी जरी अज्ञातवास
हृदयी जपला वास्तव इतिहास
सातशे वर्षांचा प्रदीर्घ काळ
मराठी भाषेचा हिने केला सांभाळ
महाराष्ट्राचे मराठी स्वराज्य
शिवरायांनी स्थापिले सुराज्य
वैभवशाली शिव पराक्रम गाथा
मोडी लिपी हिची साक्षी सर्वथा
शिवस्वराज्याचा पत्रव्यवहार
मोडी लिपीतच होतसे तयार
पेशवाईची पत्रे सारी
सुरेख मोडीत होती जारी
आंग्लकालीन महसुली करार
मोडी लिपीत ते चालती फार
शिवकालीन ते आंग्लाचा काल
मोडी लिपीचा निरंतर अंमल
पाऊणशे वर्षांच्या आधी
मोडी लिपीला दिली समाधी
त्या सुप्त लिपीचा करुनि अभ्यास
ती जागृत होण्या करू प्रयास
तिन्ही काळची जाणुनि मोडी
उलगडू तिच्यातील रहस्ये थोडी

Reviews
There are no reviews yet.