Description
अवघा महाराष्ट्र हीच एक समरभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर – अहिवंतापासून तो जिंजी तंजावरपर्यंतचा अवघा मुलुख आपल्या हाती आणला. हे करीत असताना इथल्या प्रत्येक किल्ल्याकोटांवर, नदयानाल्यांतून, खलाट्याबलाट्यांतून, डोंगरदऱ्यातून, घाटावाटांतून अनेक लढाया झाल्या. रक्ताचे पाट वाहिले, समरांगण विस्तारतच राहिले.
समरांगण म्हणजे स्फूर्तिदायक लढायांचा इतिहास, आपल्या स्वाभिमानाचा इतिहास. या इतिहासापासून आपण खूप काही शिकावं, प्रेरणा घ्यावी, यासाठी या कथा आहेत.

Reviews
There are no reviews yet.