Description
हिंदू- मुसलमान आपापसात लढू लागले म्हणजे अस्पृश्यांचा ओढ़ा मुसलमानांकडे वळू लागतो. त्यांना वाटते की मुसलमानांशी आपण दोस्ती केली की आपले हित होईल. पण ही गोष्ट दिसते तितकी खरी नाही, हे लक्षात ठेवून अस्पृश्यांनी फार सावधगिरीने वागले पाहिजे.
शारदा कायद्याच्या बाबतीत मुसलमानी धोरणाचा मला जो अनुभव आला तो काही समाधानकारक म्हणता येण्यासारखा नाही. जीर्ण व पुराणमतवादी हिंदू कर्मठांबरोबर शारदा कायद्यासारख्या आवश्यक कायद्याला विरोध करण्यासाठी बहुतेक मुसलमान तयार झालेले पाहून माझ्या मनाला मोठा धक्का बसला. या राउंड टेबल परिषदेच्या वेळीही मुसलमानांची सामाजिक मनोवृत्ती कट्टर सनातनी हिंदूंप्रमाणेच किती आकुंचित व अधोगामी असू शकते याचा दूसरा अनुभव नुकताच मला येथे आला.
वर्णाश्रम स्वराज्य संघाच्या सनातनी ब्राह्मण अध्यक्षांचा एक ख़ास टेलीग्राम मिस्टर गझनवी या मुसलमान प्रतिनिधीला परवा येथे आला. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेश चळवळीला विरोध करण्यास सनातनी हिंदूबरोबर मुसलमान बंधूंनी सहकार्य करावे अशा आशायाचा तो सन्देश होता. हिन्दुस्थानला ‘स्वराज्य’ मिळाल्यास ते हिंदूंच्या त्याचप्रमाणे मुसलमानांच्या दोघांच्याही धर्माला घातक होईल आणि म्हणून अशा स्वराज्यापासून धर्मनिष्ठ हिंदूंप्रमाणे धर्मनिष्ठ मुसलमानांनी सावध असावे, असेही त्यात ध्वनित केले होते.

Reviews
There are no reviews yet.