Description
समाज हा नेहमी गतीशील असतो. जड़त्व हे त्याला कधीही मान्य नसते. अनेक विचारांनी, आचारांनी, घटनांनी तो प्रभावित होत असतो. समाज जीवनाच्या अनेक पातळ्यांवर, व्यवहारांवर ह्या घटनांचा परिणाम होणे अपरिहार्य असते. माणूस हा समाजशील प्राणी आहे. साहित्य हे देखील माणसांच्या समाजव्यवहाराचे एक अंग होय आणि म्हणूनच समाजातील गतिशीलतेचा परिणाम साहित्यावर होणे अटळ असते. ह्या परिणामातून निरनिराळ्या साहित्यविषयक जाणिवा, प्रवाह साकार होत असताना दिसतात. ह्या गतिशीलतेची एक अपरिहार्य परिणती म्हणजे आजचे दलित साहित्य होय.

Reviews
There are no reviews yet.