Description
मानवी आनंद आणि दु:ख यांची अनुभूती डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ह्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून मेंदूवर होणाऱ्या संवेदनात्मक प्रभावांवर आधारित असते. सशक्त व बुद्धीमान मेंदू या संकेतांवर प्रगल्भ विचारांची निर्मिती करतो, ज्यातून अचूक निष्कर्ष मिळवून मन:शांती प्राप्त होते. याउलट दुर्बल मेंदूला तीच पातळी गाठण्यासाठी अधिक संकेतांची आवश्यकता भासते. कारण त्याची विचारशक्ती हवी तितकी तर्कशुद्ध नसते. म्हणूनच, आनंदाची प्रगल्भता अनुभवण्यासाठी मेंदूचा बौद्धिक आणि भावनिक विकास अत्यावश्यक ठरतो.
सखोल विचारसरणी माणसाला अध्यात्म्याच्या दिशेने नेते, जेथे तो धर्म जाती, वंश आणि सीमांच्या पलीकडे जाऊन वैश्विक चेतनेशी जोडला जातो. अध्यात्म हे निसर्गाशी सुसंगत राहण्याची प्रेरणा देते आणि त्याच्या सौंदर्याशी एकात्मता साधते. जेव्हा माणूस सर्वांच्या समान भल्यासाठी निसर्गाचे रक्षण करण्याचा एकत्रितपणे प्रयत्न करतो, तेव्हा अहिंसेची निर्मिती होते. अशा प्रकारे ज्या ज्या धर्मामध्ये निसर्गाबद्दलचा आदर राखनारा उपदेश केला जातो त्या त्या त्या धर्मांनी अध्यात्माचा उच्चांक गाठलेला असतो!’

Reviews
There are no reviews yet.