सुधारकांचा सुधारक क्रांतिबा फुले

145.00

1 in stock

पुस्तकाचे नाव सुधारकांचा सुधारक क्रांतिबा फुले
लेखक दिनेश मोरे
ISBN 978-93-82451-04-4
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १५२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

१९ वे शतक हे भारताच्या दृष्टीने सामाजिक सुधारणांचे आणि स्वातंत्र्याची आकांक्षा प्रज्वलित होण्याचे शतक आहे. या कालखंडात सामाजिक सुधारणांचा आग्रह परंपरावादी सुधारक व परिवर्तनवादी सुधारक दोघेही धरत होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर ते बाळ गंगाधर टिळक यांची परंपरा परंपरावादी होती, तर लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, आगरकर यांची परंपरा वास्तव सुधारणावादी होती. तरीही या मंडळींच्या कार्याला खूप मर्यादा होत्या. महात्मा जोतिबा फुले यांचे मूलभूत समाज परिवर्तनाचे कार्य हे दूरगामी व व्यापक प्रभाव निर्माण करणारे होते. त्यांनी धरलेला शिक्षणाचा आग्रह आणि कालबाह्य धर्मपरंपरांची चिकित्सा अत्यंत मोलाची होती. या सगळ्याचा सविस्तर आढावा प्रस्तुत पुस्तकात प्रा. दिनेश मोरे यांनी घेतलेला आहे. क्रांतिबा फुले हे सुधारकांचे सुधारक कसे ठरतात, ते सप्रमाण सिद्ध केलेले आहे. तौलनिक अभ्यास कसा असावा याचा हा उत्तम नमुना आहे. महात्मा फुले समकालीन संदर्भात नीटपणे समजून न घेतल्यास ते अपुरे आकलन ठरते. आपला अभ्यास एकांगी व दृष्टिकोन संकुचित होऊ शकतो. ते टाळण्यासाठी प्रस्तुत पुस्तक म्हणजे महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुधारकांचा सुधारक क्रांतिबा फुले”

Your email address will not be published. Required fields are marked *