Description
वैदिक धर्माचा डोलारा प्रामुख्याने यज्ञविधीवर उभा होता हे सर्वच जाणतात. यज्ञांमध्ये विविध पशुंची आणि त्यातही गाईबैलांची हत्या, मंत्रोच्चारपूर्वक फार मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असे. तसेच मांस खाणे ही गोष्टही या ब्राह्मणी धर्मात सर्रास प्रचलित होती. हिंसेला आणि मांसभक्षणाला अगदी उघडपणे मान्यता हे त्या धर्माच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी प्रमुख वैशिष्ट्य होते असे म्हणावयास हरकत नाही. मंत्रपूत गोमांसभक्षणाने कोणतेही पाप लागत नाही असे म्हणत गाईबैलांची कत्तल एकीकडे करावयाची आणि दुसरीकडे गोवधाची गणना उपपातकातही करावयाची असे विचित्र परस्परविरोधी आचरण पाहून मन थक्क होते. आजच्या गोवंशहत्याबंदी विधेयकाच्या द्वारा महाराष्ट्र शासनाने गाईविषयीचे जे प्रेम प्रदर्शित केले आहे त्याही मनोवृतीच्या मागील इतिहास तोच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तत्त्व आणि व्यवहार यांची फारकत हे आमचे फार प्राचीन धोरण राहत आले आहे. तीच परंपरा आजचे शासनही चालवते आहे.

Reviews
There are no reviews yet.