दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र

250.00

Out of stock

पुस्तकाचे नाव दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र
लेखक नीरज साळुंखे
ISBN 978-93-84091-52-1
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २०४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२० ग्रॅम

Description

प्रस्तुत पुस्तकाचे लेखक हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहेत. त्यांनी हरप्पा संस्कृतीविषयी आकलनात्मक संशोधन करण्याच्या उद्देशाने जो अभ्यास केला, त्याची निष्पत्ती म्हणजे हे पुस्तक होय. महाराष्ट्राची जडणघडण प्रामुख्याने देवगिरीच्या यादवांच्या काळात झाली असली, तरी त्याची पायाभरणी सातवाहन काळापासून चालू होती. हरप्पा जन आणि ब्राह्मणी व्यवस्थेने ज्यांना व्रात्य क्षत्रिय म्हणून धिक्कारले तो वृज्जी गण या दोहोंचे सांस्कृतिक वारसदारच महाराष्ट्राच्या जडणघडणीत कारणीभूत आहेत, हा या लेखनाचा प्रमुख निष्कर्ष आहे.

मराठ्यांच्या असंख्य कुळांचे वृज्जी गणाशी असणारे नाते सिद्ध करण्यात लेखकाने यश मिळविले आहे. हरप्पा पतनानंतर अडीच हजार वर्ष होऊन देखील हरप्पा व वृज्जी गण यांचा सांस्कृतिक वारसा अखंडपणे व ठळकपणे जपण्यात महाराष्ट्राची कुळे इसवी सन दहाव्या-बाराव्या शतकापर्यंत यशस्वी झाली होती. हरप्पापतन, आर्य-अनार्य संघर्ष, बळीवंश इत्यादी  विषयांचे लेखकाने चित्रिकरण केले असून त्यासाठी त्याने कुळचिन्हे  अभ्यासली आहेत. महाराष्ट्राची संस्कृती ही यक्ष-नाग, पिशाच संस्कृती असून मराठीची व्युत्पत्ती संस्कृतमध्ये शोधण्यापेक्षा द्रविड व पैशाची भाषेत शोधली पाहिजे, हे लेखकाचे प्रतिपादन आहे.
या लेखनासाठी वैविध्यपूर्ण साधने लेखकाने हाताळली असून ती मिळविण्यासाठी व असंख्य मंदिरांना भेटी देण्यासाठी भरपूर प्रवासही केला आहे. लेखन स्वतः इंजिनिअर असल्याने गोळा केलेल्या साधनांचे त्याने शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून साधनांचा अन्वयार्थ लावलेला आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीची जडणघडण कशी झाली व तिचे मूळ स्वरूप काय होते, याबाबत नवीन दृष्टी देणारे हे संशोधन आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दैत्य बळी व कुंतलदेश महाराष्ट्र”

Your email address will not be published. Required fields are marked *