Description
गुजरातमधील बुद्धधम्माचा एक हजार आठशे वर्षांचा हा थोडक्यात इतिहास आहे.
क्षत्रप काळात आणि मैत्रक काळात म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते आठव्या शतकाच्या शेवटपर्यंत गुजरातमध्ये बुद्धधम्म हा कदाचित प्रमुख धर्म असावा. तो आठव्या शतकानंतर लोप होऊ लागला. तेराव्या शतकानंतर विसाव्या शतकापर्यंत तो संपूर्णपणे लुप्त झाला होता. आता विसाव्या शतकात त्याचा पुन्हा उदय होऊ लागला आहे. बुद्धधम्माचा पुन्हा उदय होणे स्वाभाविकच आहे.
गुजरातमधील बुद्धधम्माची भारतातील इतर ठिकाणांप्रमाणे अनेक स्थित्यंतरे होत गेली. चिनी प्रवाशांच्या वृत्तांतानुसार आणि पुराणवस्तू संशोधनानुसार जरी थेरवादी बुद्धधम्माचे गुजरातमध्ये प्राबल्य होते तरी महायान, वज्रयान आणि तंत्रयान बुद्धधम्माचे गुजरातमध्ये अस्तित्व असल्याचे पुरावे आहेत.

Reviews
There are no reviews yet.