Description
‘ यक्ष आणि यक्षिणी ‘ हे सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीच्या विलोभनीय बाह्य आणि आंतरिक परंपरेचे आश्चर्यकारक अविछिन्न अंग आहे. वेदांतात ब्रह्मरूपात त्यांचे दर्शन होते तर त्रेता युगात कुबेराच्या रुपात ते दिसतात. कथासरित्सागरात, तथागत भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथांत, तीर्थकारांच्या चरित्रकथात, जनजातींच्या लोककथांत सर्वत्र ते व्याप्त आहेत. मातृदेवता असोत की अप्सरा असोत, यक्षाशी त्यांचे अभिन्न नाते. अगदी आजही ग्रामीण जीवनात आसरांच्या रूपात त्यांचे दर्शन होते. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, कला, शिल्प, साहित्य किंबहुना भारतीयांचे परिपूर्ण जनजीवन कळत न कळत त्यानी व्व्यापलेले आहे. पंडित, वेदज्ञ, धर्मज्ञ, इतिहासकार, पुरातत्त्ववेत्ते, समाजशास्त्रज्ञ अशा सर्वांच्याच कुतूहलाचा, अभ्यासाचा हा विषय आहे.
‘ मिथक साहित्यातील यक्षप्रतिमा ‘ या ग्रंथात लोकदेव, लोकधर्म, लोकजीवन आणि लोकसाहित्य या साऱ्यांचा एक नैसर्गिक समन्वय आणि संस्कृतीची सुसूत्रता लक्षात येते. हा ग्रंथ केवळ संशोधन वा प्रतिभासाधन नाही, तर भारतीय संस्कृतीच्या एका समस्यापूर्तीचा प्रयत्न आहे. परिपूर्ण संदर्भ देत निष्कर्षांप्रत पोहोचविणाऱ्या उपसंहारापर्यंतच्या सहा प्रकरणांतून केलेली मांडणी शास्त्रीय, तर्कसंगत आणि दिशादर्शक आहे. केनोपनिषदाच्या भाषेत सांगायचे तर ‘ विजानीहि कीमेतत यक्षमिति ‘ असा हा ग्रंथ आहे .
Reviews
There are no reviews yet.