Description
तुम्हाला हे ठाऊक आहे का ?
- दीडशे वर्षे जगू शकणारा मानव या जगात केव्हाच जन्माला आलाय.
- आज आपण ज्या स्क्रीनकडे बघतो आहोत तो लवकरच आपल्या शरीरात प्रवेश करणार आहे.
- आपण नाष्ट्यापूर्वी ‘हेप्पीनेस पिल्स’ घेऊ तो दिवस फारसा दुर नाही.
- झोपायला जाण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराला ‘चार्जिंग’ करायला लागू शकतं.
होय, आपलं भवितव्य असं काहीसं असेल आणि या प्रवासाला सुरुवात केलेला मानव या प्रवासा अखेरीस संपूर्णपणे वेगळा, बदललेला असेल. एक समाज आणि सजीव म्हणूनही तंत्रज्ञान आपल्यात कोणते बदल घडवू शकेल, यावर हे पुस्तक भाष्य करतं.
पुढची पिढी कशी असेल? पुढच्या पिढीतील स्त्री – पुरुष अगदी वेगळे असतील का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर कृत्रिम बुद्धिमत्ता, नैनोटेक्नॉलॉजी, क्वांटम कॉम्प्यूटिंग, जनुकशास्र कसं काम करतं हे समजून घ्यायला हवं.
प्रेम, नैतिकता व मूल्य या मानवी वैशिष्ट्यांची गणितं बदलून हे नवीन तंत्रज्ञान मानवाचं भवितव्य कोणत्या दिशेला नेईल, हे जाणून घ्यायचं असेल तर आवर्जून वाचलचं पाहिजे असं पुस्तक
Reviews
There are no reviews yet.