Description
कुम्भोपम सुत्त
या सुत्तामध्ये बुद्ध भिक्षूंना सांगतात, की एक कोल्हा व एक कासव असते. त्या दोघांनाही खूप भूक लागलेली असल्यामुळे ते खाण्याच्या शोधात बाहेर पडलेले असतात. जेव्हा ते दुरूनच एकमेकांना येत असलेले पाहतात, तेव्हा कोल्हा असे ठरवतो, की याला झडप घालून याची शिकार करायची, तर कासव ठरवते, की याच्या तावडीत सापडायचे नाही. त्यामुळे ते कासव कोल्हा दिसताक्षणी त्याचे अंगप्रत्यंग कवचात ओढून नि:स्तब्ध थांबते. ते त्याचे शरीर अवयव बाहेर काढेल या आशेने कोल्हा तिथेच थांबतो. शेवटी कंटाळून तो कोल्हा तिथून निघून जातो, अगदी त्याप्रमाणेच भिक्षूनों मार तुमच्यावर चाल करून येण्यासाठी टपलेलाच असतो. त्यामुळे भिक्षूनों इंद्रियांना कासवाप्रमाणे संयमित ठेवा.
अशा प्रकारे समाजामध्येदेखील कोल्ह्याप्रमाणे माणसे असतात. ती त्यांची दुष्ट प्रवृत्ती समोर दाखवत नाहीत, परंतु ती मनात बाळगून असतात व फक्त आपल्या कमजोरीवर झडप घालण्यासाठी वाट पाहत बसलेली असतात. त्यामुळेच भिक्षुंप्रमाणेच सर्वसामान्य मनुष्यांनी देखील सदैव आपली इंद्रिये संयमित ठेवावीत, जेणेकरून ते कुठल्याही दुष्ट प्रवृत्तीला बळी पडणार नाहीत.
संयुक्त निकाय, सगाथवग्ग
Reviews
There are no reviews yet.