Description
विज्ञान हा फक्त प्रयोगशाळेतील संशोधनाचा भाग नाही, तर ते आपल्या आजूबाजूच्या जगातही आहे.
मानवी संस्कृतीचा इतिहास हा तसे पाहता वैज्ञानिक प्रगतीचाच इतिहास आहे. चाकाच्या आणि अग्नीच्या शोधातच आधुनिक विज्ञानाचे बीज आहे. ह्या बीजातून विज्ञानाचा विशाल वृक्ष विस्तारला. तो अजूनही विस्तारानेच आहे. असंख्य अशा ज्ञानशाखा या वृक्षावर फुटल्या आणि त्या वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मानवापुढे मांडीत आहेत. परंतु इतर वृक्षांप्रमाणे ह्या वृक्षावरही एक आगंतुक पण निरुपयोगी असे बांडगुळ उगवले आहे. ते बांडगुळ आहे छद्म विज्ञानाचे, आध्यात्म्याचे आणि अंधश्रद्धेचे .
विज्ञान दृष्टी आणि सृष्टी या पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे काय? गर्भसंस्कार, ज्योतिष, वास्तुशास्त्र, पितृपक्ष, पौर्णिमा, देव नावाची संकल्पना या पौराणिक अंधश्रद्धान्बरोबरच आधुनिक अंधश्रद्धा कोणत्या ? कालगणना, मृत्यु आणि जीवन, वाद, वितंड आणि चर्चा अशा विविध विचारांवर चिंतन केलेले आहे. वाचकाला वैज्ञानिक दृष्टिकोणाने जगण्यासाठी उद्युक्त करणारे हे पुस्तक वाचनीय आहे .
Reviews
There are no reviews yet.