Description
काळाची गरज, वाचकाची वाढती जाण, मानसिक आरोग्याचे भान ह्यासोबतच लिखाणाचीही काही वैशिष्ट्ये असली पाहिजेत. एक तर हे पुस्तक म्हणजे लेखकाचा स्वत: च्या विकासाचा प्रवास आहे. त्यामुळे त्यातली भूमिका तज्ञ माणसाची नाही. डॉ. अल्बर्ट एलीस ह्यांनीसुद्धा त्यांच्या मानसोपचार पद्धतीची मूलतत्त्वे शोधली ती स्वानुभव, त्यावरचे चिंतन आणि चौफेर वाचन ह्यामधून. दूसरे असे की, ”स्वभाव – विभाव” मधल्या मन उपचार तत्त्वांना बैठक मात्र आपल्या मराठी संस्कृतीची आहे. त्यात कधी संत कवी येतात, कधी खाण्याचे पदार्थ येतात तर कधी अगदी आपल्या अशा सवयी आणि पद्धती. . .
अजून एक निरीक्षण असे की ह्या पुस्तकामध्ये अनेक नात्यांना स्पर्श केला आहे. पालक आणि मुले ह्यांच्यातले बंध, पती आणि पत्नी ह्यांमधले भावरंग ह्या लिखाणामध्ये कवडशासारखे पसरले आहेत. त्यामुळे वाचकाला आयडेंटीफाय करायला वाव मिळतो. एका पावलाची मैत्री दुसऱ्या पावलाबरोबर जमली तरच प्रवास संपन्न होणार. हे नाते, निरामय स्वीकाराचे करण्याची शक्तीही आपल्याच हातात असते असे हे पुस्तक, आर्जवाने पण ठामपणे सांगते.
Reviews
There are no reviews yet.