Description
मराठ्यांच्या इतिहासाच्या या दुसऱ्या खंडात प्रामुख्याने शाहू आणि शाहूकाल (१७०७ – १७६१) या कालखंडाचा इतिहास आला आहे. शाहूच्या आगमनाबरोबरच मराठेशाहीत भट घराण्याचा अधिक जोमाने प्रवेश झाला. भट घराण्यातील बाळाजी विश्र्वनाथास पेशवेपद मिळाले आणि मराठेशाहीच्या अस्तापर्यंत ते त्याच घराण्यात टिकून राहिले. प्रस्तुत खंडात बाळाजी विश्र्वनाथ, थोरले बाजीराव आणि बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीचा समावेश केला आहे. या खंडाचे वैशिष्ट्ये म्हणजे राजकीय इतिहासाच्या विवेचनाबरोबरच मराठ्यांच्या साम्राज्याचे स्वरूप, शासन व्यवस्था, सामाजिक परिस्थिती, आर्थिक जीवन, मराठ्यांचे स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला, वाङ्मय इत्यादी विषयांचाही अंतर्भाव केला आहे. या विषयांच्या विवेचनात संपूर्ण १८ व्या शतकाचा विचार करणे अपरिहार्य होते. त्यामुळे खंडाची कालमर्यादा १७६१ पर्यंत असली तरी ती प्रामुख्याने राजकीय इतिहासापुरतीच मर्यादित आहे याचा येथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे.
Reviews
There are no reviews yet.