Description
क्रांतिबा जोतिबा फुल्यांनी प्रस्थापित मनुवादी जात, धर्म, विषमता, स्त्रिया, शुद्रातिशूद्र, शेतकरी यांचे दास्य, बंदिस्त शिक्षण व्यवस्था या अमानुष अंधारावर १९ व्या शतकात नांगर धरला. अमानवी व्यवस्थेवर फुली मारली. फुल्यांनी या अन्यायी व्यवस्थेवर केवळ नकाराची फुलीच मारली नाही तर समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारित नवा पर्याय उभा केला. जाती – धर्माच्या प्रदूषित पर्यावरणात जोतिबांच्या क्रांतिकार्याचे मूल्यमापन झाले नाही, याचा साधार वेध डॉ. प्रतिभा अहिरे यांनी घेतला आहे.
जोतिबांचे वाङ्मय व कार्य क्रांतिकारक असताना त्यांना सुधारक ठरवण्यात आले. वाङ्मयातील आशय न पाहता त्यातील व्याकरण तपासण्यात आले. याचा लेखा जोखा घेऊन त्यांचे वाङ्मय नव्या रुपात सादर करत आहोत. जागतिकीकरणात भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही यांची आघाडी होवून शोषित, वंचितांना जगाच्या वेशीबाहर ढकलण्याचे कार्य या शक्ती करीत आहेत. त्याविरुद्ध लढण्यासाठी सर्वहरा वर्गाच्या हाती जोतिबांचे क्रांतिकारक वाङ्मय देत आहोत. डॉ. अहिरे यांनी भीषण वर्त्तमानात जोतिबांच्या क्रांतिकारी कार्याचे, तत्त्वज्ञानाचे केलेले पुनर्कलन नव्या लध्याला उद्युक्त करील आणि मनुवादी मानसिकतेला अंतर्मुख करेल.
Reviews
There are no reviews yet.