Description
भारतामध्ये २०१३ पासून प्रत्येक मनुष्याची स्थिती ही सजग बनत आहे. सामान्य माणसाला प्रत्येक गोष्टी वेठीस धरून त्याचेकडून देशहिताच्या नावाने वेगवेगळी कामे करून घेतली जात आहेत आणि त्याबद्दल त्याला अंधारात ठेवण्यासाठी धार्मिक उन्माद आणि जातीय तेढ निर्माण केली जात आहे, त्यामुळे देशाचे वातावरण शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण दिसून येत नाही.
भारतामध्ये राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांची धार्मिक समस्या आहे का ? भारत हां देश कुठल्या ेका धर्माच्या मक्तेदारीत बांधून ठेवण्यात आला आहे का ? भारताच्या संविधानात याची स्पष्ट उत्तरे सापडतात. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. या बाबतीत हिन्दू मुसलमानांचा वाद पेटू नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फार मार्गदर्शनपर आहेत.
१९४० त्यानी लिहिलेल्या पाकिस्तान संबंधी विचार आणि त्यानंतर त्यावरच १९४५ साली लिहिलेल्या पाकिस्तान – भारताचे विभाजन या दोन ग्रंथांमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते. आज हिन्दू मुसलमान ही धार्मिक समस्या अतिशय तीव्र होत असताना भारतातील मुसलमानांनी आणि विशेषता भारतातल्या हिन्दू म्हणून गौरव करून घेणाऱ्या हिन्दू लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार आज वाचण्याची नितांत गरज असल्याने हा ग्रंथ पुन्हा वाचकांसाठी तयार करण्यात आलेला आहे. खरेतर भारतातील प्रत्येकच नागरिकाने बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा वाचलीच पाहिजे. आजच्या परिस्थितीत हिन्दू मुसलमानांच्या प्रश्नांवर योग्य उपाय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ प्रत्येकाने वाचण्यासी गरज आहे.
Reviews
There are no reviews yet.