Description
मूर्त रूपातले तुझे आभास
म्हणजे तू आणि तुझ्या प्रार्थना.
त्यापेक्षा
जुन्या वस्तुसंग्रहाल्यात
तू अधिक छान दिसतोस
तुझ्या प्राचीनत्वाचा प्रत्यय
तिथेच अधिक चांगला येतो.
हे उन्मना,
तुला ठरवता आलं
तर तू कुठं असशील ?
जिथं तू माझ्यासारख्या असशील
आणि मी तुझ्यासारखा दिसेन.
Reviews
There are no reviews yet.