शब्द सुरांची ग्रेट भेट

135.00

10 in stock

पुस्तकाचे नाव शब्द सुरांची ग्रेट भेट
लेखक राधिका गोडबोले
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १२८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

प्रत्यक्षात असं संगीतमय आयुष्य जगणारे अनेक गुणी कलाकार मला वृत्तपत्रांमध्ये उपसंपादक म्हणून काम करताना भेटले. अशा ग्रेट – भेटी म्हणजे कोरड्या राजकीय अथवा नकारात्मक बातम्यांच्या वाळवंटात अचानक अनुभववायला मिळालेले अमृतकण, आणि कमी आर्थिक लाभाच्या नोकरीत काहीवेळा जाणवणाऱ्या टोचणीवरील हळुवार फुंकरच होती. वृत्तपत्रातील पुरवण्याचं काम करताना त्या कामातला वेगळेपणा हे प्रमुख आकर्षण होतं. त्यात मान्यवर संगीत कलाकारांच्या भेटी नतमस्तक करणाऱ्या, खूप काही शिकविणाऱ्या होत्या.  हे कलाकार लहरी असतात अशा आशयाच्या अनेक कथा रंगवून सांगितल्या जातात, पण प्रत्यक्षात तसा अनुभव कधीच आला नाही.  मैफली, प्रवास, रेकॉर्डिंग , शिष्यांना मार्गदर्शन या सगळ्यात ते अत्यंत व्यग्र असतात.  भेटायला येणारे चाहते काहीवेळा त्रासदायक ठरतात.  अशा वेळी त्यांचं क्वचित चिडण स्वाभाविक आहे.  प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या कलाकारांना भेटण्यात काहीवेळा त्यांचे सहाय्यक, सचिव क्वचित अडचण  ठरू  शकतात; पण प्रत्यक्षात भेट झाल्यावर हे कलाकार अगदी निर्गवी, साधे, प्रसिद्धीची अजिबात गरज नसूनही समरसून मुलाखत देणारे, चांगल्या प्रश्नांना दिलख़ुलास उत्तरं देणारे असतात असाच अनुभव आला. मुलाखतीनंतर निघताना नमस्कारासाठी वाकल्यावर ‘ इसको बड़े प्यारसे लिखना‘ म्हणणारे उ. अल्लारखा, ‘ संभलकर जाना’ म्हणणारे उ.  झाकिर हुसैन, दिलख़ुलास गप्पा  मारताना मलाही कॉफी घेण्याचा आग्रह करणाऱ्या गानकोकिळा  आदरणीय लतादिदी, मिस्ड कॉल बघून स्वत: फोन करणारे पं. विजय घाटे, मुलाखतीनंतर दुसऱ्या कार्यक्रमात स्वतः ओळख दाखवणारे हरिहरन, त्याच प्रमाणे भरभरून बोलणारे शंकर महादेवन, पं.  संजीव अभ्यंकर, नयन घोष, शैलेश भागवत, नीलाद्री कुमार, शुभा मुद्गल असे सगळेच कलावंत स्वत:च्या गुणवत्तेनी जगप्रसिद्ध झालेले, सतत जगप्रवास करणारे तरीही जमिनीवर घट्ट पाय रोवलेले. 

संगीत हा संवाद साधण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. 

संगीत में है ऐसी फुहार, पतझड़ में भी जो लाए बहार,

संगीत को ना रोके दीवार, संगीत जाए सरहद के पार,

                                         संगीत माने ना धर्म जात, संगीत से जुडी कायनात ।।      

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शब्द सुरांची ग्रेट भेट”

Your email address will not be published. Required fields are marked *