Description
सजीवाचा संपूर्ण जनुकीय ऐवज म्हणजे “जीनोम” (जनुककोश). जीनोमचा सर्वांगीण अभ्यास करणाऱ्या जीनोमिक्स (जनुककोशशास्त्र) या अत्याधुनिक जीवविज्ञानाच्या शाखेचा मराठीतून रोचक परिचय असीम चाफळकर यांनी या पुस्तकातून करून दिला आहे. यामध्ये लेखकाने जीनोमबद्दलची मूलभूत माहिती, जीनोमिक्सवर आधारित तंत्रज्ञानपद्धती, माहिती तंत्रज्ञान, सजीवसृष्टी आणि जीनोमिक्सचा आंतरसंबंध तसेच जीनोमिक्सची कृषीक्षेत्रातील आणि आरोग्यक्षेत्रातील उपयुक्तता आगळ्या वेगळ्या शैलीत विशद केली आहे.
काही तज्ञ संशोधकांच्या मुलाखतीतून लेखकाने या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. कलात्मक रेखाटने तक्ते, आलेख व छायाचित्रे यांचा सुयोग्य उपयोग केल्यामुळे ज्ञानवर्धक माहिती वाचकांपर्यंत सुलभतेने पोहचते.
Reviews
There are no reviews yet.