Description
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी एकोणिसाव्या शतकांत पेशव्यांच्या पुण्यात अस्पृश्यांसाठी व मागासांच्या मुला-मुलींसाठी शाळा काढल्या. सतीप्रथा व केशवपनाला विरोध केला. ब्राह्मणांच्या अनिष्ट रूढ़ी विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. विधवा पुनर्विवाहाला चालना देणारी सभा काढली. विधवा मातांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह काढले, दुष्काळात सरकारला मदत कार्य सुरू करायला भाग पाडले. ब्राह्मण बालविधवेचा मुलगा दत्तक घेऊन समाजाचा विरोध असताना, त्याचा स्वजातीत मिश्र विवाह घडवून आणला. प्लेगच्या भयंकर साथीत हॉस्पीटल काढून शेकडो रोग्यांची शुश्रुषा केली, त्यातच संसर्ग होऊन त्यांना मृत्यु आला. सावित्रीबाईंचे सारे चरित्रच अत्यंत तेजस्वी आणि स्फूर्तिदायक आहे. सावित्रीबाई कार्य आणि कर्तृत्व हे ही पुस्तक नव्या पिढीने अवश्य वाचायला हवे.
Reviews
There are no reviews yet.