भारतीय राष्ट्रवाद विरुद्ध हिंदू राष्ट्रवाद
₹250.00 ₹225.00
Out of stock
पुस्तकाचे नाव |
भारतीय राष्ट्रवाद विरुद्ध हिंदू राष्ट्रवाद |
लेखक |
राम पुनियानी |
ISBN |
-- |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
२६० |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
३१० ग्रॅम |
Description
गेल्या तीन दशकांपासून भारतीय समाजाच्या दुर्बल घटकांच्या सामान्य व विशेष करून लोकशाही हक्कांवर आघात करणाऱ्या असंख्य घटना घडत आहेत. वास्तविक पाहता याची सुरवात शहाबानो खटल्याच्या निकालापासून प्रकर्षाने झाली. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सरकारने फिरवला आणि या निकालाच्या विरुद्ध मुस्लिमांना खूष करण्यासाठी पार्लमेंटचा कायदा केला. त्यामुळे मुस्लिम नेत्यांचे समाधान झाले. अशा प्रकारच्या अनेक घटनांची श्रृंखला यापुढे चालू राहिली. या घटनांत बाबरी मशिदीचे कुलूप तोडण्याचा बेकायदा प्रकार, अडवाणींची रथयात्रा आणि बाबरी मशिदीचा पाडाव यांचा समावेश होतो. या घटनांची प्रतिक्रिया म्हणून मुंबई, सुरत, भोपाळ येथील जातीय दंगलींना ऊत आला आणि त्यात मुस्लिम समाजाची बरीच हानी झाली. या घटनेबरोबर ख्रिश्चन समाजावर सुद्धा ठिकठिकाणी आघात होऊ लागले. त्यातूनच पुढे गुजरातचे हत्याकांड कंदमाल आणि आसामचा हिंसाचार आणि मुज्जफरनगरची जातीय दंगल अशाही घटना घडू लागल्या. समाजातील धार्मिक अल्पसंख्यांकांवरील हल्ले अगदी गावपातळीवरून खूप प्रकर्षाने होऊ लागले. काही घटनांच्या हिंसेची तीव्रता कमी होती. आर्थिक हानी, जीवित वित्ताची हानी यांचे प्रमाण फार मोठे नसले तरी लहान मोठ्या सर्व घटनांनी मिळून जातीय धृवीकरणाची प्रक्रिया आणि त्यामधून अल्पसंख्यांकांना भावनिकदृष्ट्या अस्थिर करून धमकावणी देण्याची प्रक्रिया मात्र उच्चपातळीवरची होती.
Reviews
There are no reviews yet.