Description
भगतसिंग हे थोर देशभक्त आणि क्रांतिकारक समाजवादी होते. पण त्याचबरोबर भारतातील सुरुवातीच्या काळातील ते एक मार्क्सवादी विचारवंत आणि विचारसरणीचिंतक (ideologue) होते. अगदी लहानपणापासून त्यांना वाचनाने झपाटून टाकले होते. त्यांच्या बहुआयामी वाचनाचा त्यांच्या विचारावर व लेखनावर प्रभाव पडला आहे. भगतसिंग यांनी न्यायालयात केलेली कित्येक निवेदने, त्यांनी आपल्या वडिलांना व कॉम्रेडसना उत्कटपणे लिहिलेली पत्रे, क्रांती, व जातीयवादाविषयीची त्यांची मर्मदृष्टी आणि नास्तिकतेवरील त्यांचा अढळ विश्वास या सर्वांतून एकाच वेळी स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या व पूर्णपणे विकसित झालेल्या मनाचा प्रत्यय येतो. भगतसिंग यांचे लेखन विविधांगी आहे.
Reviews
There are no reviews yet.