Description
कौटिलीय अर्थशास्त्र हा ‘राज्य’ या विषयाशी संबंधित असलेल्या प्रत्येक विषयाचा अत्यंत सखोल व सर्वांगीण विचार करणारा राज्यशास्त्रावरील एक अमूल्य ग्रंथ. भूमी संपादन करून टिके रक्षण कैसे करावे, त्या भूमीवर वसणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी काय करावे, त्यांचे रक्षण कसे करावे, त्यांचे नियंत्रण करण्यासाठी राज्यकारभार कसा करावा, राज्ययंत्रणा कशी उभारावी, ती शक्यतो निर्दोष होण्यासाठी कोणते उपाय योजावेत, शत्रूला कसे जिंकावे अशा राजनीतिशास्त्रातील अशा अनेक विषयांचे विवेचन करताना ‘मनुष्यस्वभाव’ हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक सतत नजरेपुढे ठेवल्यामुळेच सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी रचलेला हा ग्रंथ आजही लक्षणीय ठरला आहे. रसायनशास्त्रापासून रत्नपरीक्षेपर्यंत विविधांगी ज्ञानाचा व्यासंगपूर्ण खजिना ज्या कौटिल्याने सर्वांना उपलब्ध करून दिला त्याच्या अनन्यसाधारण बुद्धिमत्तेमुळे आणि अलौकिक विद्वत्तेमुळे हां ग्रंथ दीपस्तंभाचे कार्य करीत राहिला आहे.
वसुंधरा पेंडसे नाईक या संस्कृत विषयात विशेष रस घेणाऱ्या पत्रकार आहेत. शालान्त परीक्षेत जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळालेल्या वसुंधरा बाईंनी संस्कृत या विषयात एम. ए. ची पदवी घेऊन विल्सन महाविद्यालयात पाच वर्षे संस्कृत विषयाच्या व्याख्याता म्हणून काम केले. मुंबई दूरदर्शन वर सुमारे बारा वर्षे अमृतमंथन या संस्कृतविषयक कार्यक्रमाचे संचालन त्या करीत असत. स्थापत्यशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांतील ज्ञान आजही कसे उपयुक्त आहे हे त्यातून साधार स्पष्ट केले जात असे. रविवार लोकसत्तेमधील चिरंतन ग्रंथ या सदरातून व रविवार सकाळमधील संस्कृतिसंपदा या सदरातून त्यांनी अनेक संस्कृत ज्ञानशाखांचा व ग्रंथाचा सविस्तर परिचय वाचकांना करून दिला आहे.
Reviews
There are no reviews yet.