पाली-मराठी शब्दकोश

500.00

Out of stock

पुस्तकाचे नाव पाली-मराठी शब्दकोश
लेखक जगन्नाथ विष्णू उर्फ बाबा भारती
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या २९९
आकार ५ * १० इंच
वजन ४८० ग्रॅम

Description

बौद्ध वाङ्मय पूर्णत: पाली भाषेत आहे. बौद्ध वाङ्मयाचा अभ्यास करताना प्रथम पाली भाषा अवगत करून घेणे – शिकणे आवश्यक आहे. कोणतीही भाषा अवगत होण्यास त्या भाषेतील विपुल शब्दसंग्रह परिचितच नव्हे तर व्याकरणदृष्टया माहीत असणे आवश्यक आहे.  तरच त्या भाषेचा अभ्यास होवून तिच्यातील वाङ्मयीन  कलाकृती तत्त्वज्ञान आणि जनसामांन्यावर तिचा झालेला इष्टा- निष्ट परिणाम पाहता येईल. 

पाली भाषेला ” बुद्ध वचन ” किंवा ” भगवान बुद्धाच्या संदेशाचा ठेवा ” असे मानले जाते. बुद्धकाळी पाली भाषा ही सामान्यजनांची बोलीभाषा प्राकृत मानली होती. त्याच भाषेतून भगवान बुद्धांनी आपल्याला प्राप्त झालेल्या मानवी जीवनाविषयी विकसीत, प्रगत व सर्वाभिमुखी सुखशांती देणारी तत्त्वे प्रतिपादन केली. त्या प्रचारासाठी त्यांनी आपल्या अनुयायांना – भिक्खुंना जगाच्या कानाकोपऱ्यात पाठविले.

ही पाली भाषा आज जनसामान्यांपासून अनेक कारणांनी अलिप्त राहिली गेली होती. आजच्या समाजाला परत त्याच पाली भाषेची नितांत गरज भासू लागली आहे. तिच्यातील सदधम्माची शिकवण साऱ्या जगाला  आकर्षित करीत आहे. म्हणून पाली भाषेचा आत्मीयतेने अभ्यास करणारी तरुणपिढी हिरीरीने सरसावत आहे. परंतु फार काळ पडद्याआड गेलेल्या या भाषेच्या अभ्यासाची सोया उपलब्ध नसल्याचे इच्छा असूनही तिच्यापासून वंचित रहावे लागत आहे. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाली-मराठी शब्दकोश”

Your email address will not be published. Required fields are marked *