Description
आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञ तोषावें ।
तोषोनिं मज द्यावें । पसायदान हैं ।।
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परें । मैत्र जीवांचे ।।
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांच्छिल तो ते । प्राणिजात ।।
वर्षत सकलमंगळी । ईश्र्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूतळीं । भेटतु या भूतां ।।
चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणीचे गांव ।
बोलते ते अर्णव । पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिन्ही लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकीं इये ।
दृष्टादृष्टविजये । होआवें जी ।।
तेथ म्हणे श्रीविश्वेशराओ । हा होईल दानपसावो ।
येणें वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।
Reviews
There are no reviews yet.