Description
मऱ्हाठी मर्यांनी खुद्द बादशहाच्या खास तंबूवरचे चार सोन्याचे कळस कापून आणले. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या सेनापतींनी रायगडापासून तो थेट कर्नाटकातील जिंजीच्या पायथ्यापर्यंत बादशाही सैन्याचा धुव्वा उडविला. गावोगावच्या पिसाळलेल्या जनतेने बादशाही रसदेचे काफिले जागोजाग मारुन मोगली सैन्याची भरमसाट उपासमार केली तेव्हा कुठे बादशहाला साक्षात्कार झाला की आपण समजत होतो तसे मऱ्हाठे हवा तो अवमान, जुलुमजबरदस्ती मेंग्याप्रमाणे मुकाटतोंडी सहन करून, दैवाला दोष देत बसणारे गलथान हैवान नसून ‘मऱ्हाठों शैतानकी अवलाद है.’ राज्यक्रांतीच्या या काळात महाठी मुत्सद्द्यांनी. कारकुनांनी. सरदारांनी. बारगिरांनी आणि आबालवृद्ध लोकांनी त्यागाची. शौर्याची. डाव आणि आत्माहुतीची कमाल शीग गाठली. म्हणूनच रायगडावर कोसळलेले हिंदवी स्वराज्य पुनश्च दुप्पट-चौपट दराऱ्याने नि वैभवाने साताऱ्याला झळकू लागले.
Reviews
There are no reviews yet.