Description
इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय ? याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जातींच्या आणि संप्रदायांच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रुंसोबत भिन्न आणि परस्परविरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही भर पडणार आहे. ह्या वास्तवाच्या जाणीवेने मी अधिकच चिंतातुर झालो आहे. भारतीय लोक आपल्या तत्त्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील? मला माहीत नाही. परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि कदाचित कायमचे घालविले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.
Reviews
There are no reviews yet.