Description
सात बेटं असल्यापासून किंबहुना त्याही आधी कधी तरी अस्तित्वात आलेल्या या मुंबई नगरीचा आजवरचा सारा प्रवास जाणून घेण्याचं या माणसाला अफाट वेड आहे. मग तो अख्खी मुंबई पालथी घालतो. जुनी दफ्तर शोधतो. मुंबईविषयी कळलेला कुठलाही लहानमोठा तपशील, माहितो तो, बारकाईने तपासून घेतो. ही अशी शोध मोहीम चालू असतानाच ज्यांना कुतूहल आहे त्यांना मुंबईची कहाणी सांगत सुटतो. सोशल मीडियावर भरभरून लिहीत सुटतो. इथे रोजीरोटीचा विचार दुय्यम ठरत यातून हाती काय लागतं तर अज्ञात मुंबई! तीच सारी धावपळ म्हणजे हे पुस्तक – ‘अज्ञात मुंबई’!
माझी खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर वाचक मुंबईभर आपापल्या कामानिमित्त फिरताना आजवर जसे फिरत होते तसे न फिरता, तर या पुस्तकाने परिचय करून दिलेली ‘मुंबई’ नीट पाहत जातील. जाताजाता त्या काळात फेरफटकाही मारून येतील. मुंबईत एका जागी थांबून राहायला कुणाला वेळ नसतो. सवड त्याहून नसते. जो तो धावतच असतो. परंतु हे पुस्तक वाचणारा क्षणभर का होईना आता जातायेता जागीच थांबणार. रोजचंच हे सभोवताल पाहणार आणि अचंबितही होणार… अशी होती मुंबई…?
Reviews
There are no reviews yet.