Description
तुकाराम महाराजांनी ज्या समताधिष्ठित, न्याय, बंधुता, प्रेम, करुणा आणि माणुसकी यावर आधारलेल्या समाजाची निर्मिती करण्याकरता आपलं सर्व जीवन वाहिलं, अशाच समाजाची निर्मिती करण्याकरता लेखक आपल्या परीनं प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराजांच्या सतराव्या शतकातील शिकवणीची आजच्या एकविसाव्या शतकातही कशी आवश्यकता आहे हेही ते आपल्या निरुपणात दाखवून देतात. त्यांनी निवडलेले अभंग आणि त्यावर केलेले भाष्य याची साक्ष देतात. आज आम्हाला अशा स्वतंत्र मुध्दीनं विचार करणाऱ्या कृतिशील विचारवंतांची गरज आहे. पुस्तकी विद्वानांची नाही. समाजान लेखकाचे केवळ अभिनंदन न करता त्यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन आजच्या व येणाऱ्या पिढीतून असे विचारवंत आणि कार्यकर्ते निर्माण करण्याकडे आपले लक्ष वळले पाहिजे. या पुस्तकाच्या निमित्ताने तुकाराम महाराजांच्या सर्वच अभंगांचं परिशीलन वाचक करतील अशी मी अपेक्षा करतो.
– न्यायमूर्ती पी. बी. सावंत
श्री. पाटील हे निश्चितच एक व्यासंगपूर्ण अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याचे त्यांच्या प्रभावी चितनाद्वारे मला जाणवले, असा सारा त्यांचा अभ्यास त्यांच्या प्रत्येक अभंगासंबंधीच्या चर्चेतून आपणास पदोपदी जाणवत असतो. त्यामुळे त्यांच्या त्या अभ्यास व मननाद्वारे अभंगाना त्यांनी एका विलक्षण, व्यापक आणि उंच पातळीवर नेऊन ठेवले आहे. तुका आकाशाएव्हढा हे त्यांच्या स्पष्टीकरणातून आपल्या प्रत्ययास येते.
– बिशप थॉमस डाबरे
Reviews
There are no reviews yet.