Description
‘माणुसकी प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा.’
‘संघटना करावयाची असेल तर धर्मांतर करा.’
‘सामर्थ्य संपादन करावयाचे असेल तर धर्मांतर करा.’
‘समता प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा.’
‘स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर धर्मांतर करा.’
‘संसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मातर करा.’
‘जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता ?’
‘जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही. त्या धर्मात का राहता?’
‘जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता ?’
‘जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ?’
‘ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे !’
‘ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानले जाते, तो धर्म नसून रोग आहे! ‘
‘ज्या धर्मात अमंगल पशुंचा स्पर्श झाला असताना चालतो, पण माणसाचा स्पर्श चालत नाही, तो धर्म नसून वेडगळपणा आहे.’
‘जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्र धारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे !’
‘जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे.’
‘वाचेने सर्वांभूती एक ईश्वर म्हणणारे आणि कृतीने माणसाला पशुतुल्य लेखणारे लोक दांभिक आहेत, त्यांचा संग करू नका.’
Reviews
There are no reviews yet.