Description
- लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर समाजात श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद सर्व समाज समतेच्या पातळीवर उभा असला पाहिजे. समाजात भेद असले तर समाजातील शक्ती विभागतात व समाजाला निःसत्त्व करतात.
- लोकशाही चिरावू करणारी दुसरी संजीवनी म्हणजे विरोधी राजकीय पक्ष राज्यकत्यांचा एक पक्ष आणि विरोधकांचा एक पक्ष या दोन्ही खांबांवर लोकशाहीचा राजवाडा उभारला जातो. यापैकी एखादा जरी खांब पोकळ झाला की लोकशाहीचा राजवाडा खाली कोसळतो. या दोन्ही पक्षांचे बलाबल त्यांना निवडणुकीत जो समाजापासून पाठिंबा मिळतो, त्यावर अवलंबून असते.
- लोकशाहीला चिरायू करणारी तिसरी संजीवनी म्हणजे कायदा आणि राज्यकारभार यांच्यापुढे सर्वांना समसमान धरणे.
- चौथी संजीवनी म्हणजे संसदीय नीतिमत्ता आणि सारासार विचार यांचे काटेकोर पालन करणे.
- लोकशाही टिकवण्यासाठी आणखी एका संसदीय गोष्टीची जरूरी आहे ती म्हणजे बहुसंख्य पक्षाने अल्पसंख्य पक्षाला सन्मानाने वागविणे, त्यावर अन्याय न करणे.
Reviews
There are no reviews yet.