Description
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून साक्षेपी लेखक रा. ना. चव्हाण यांनी लिहिलेल्या लेखांचे पुस्तकात रूपांतर झाले आहे. रा. ना. चव्हाण यांचे हे लेख इतरांपेक्षा वेगळे व लक्षवेधक स्वरूपाचे असल्यामुळे हे पुस्तक नीतिशास्त्र आणि सत्ताशास्त्र, धर्मसंकल्पना आणि नास्तिकता, कृषी आणि औद्योगिक, सहमती आणि संघर्ष, सामाजिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य, इतिहासदृष्टी आणि आधुनिकदृष्टी यांचे वर्णन, विवेचन आणि विश्लेषण करणारे आहे. छत्रपती शाहू महाराजांचे जीवनचरित्र मूलगामी परिवर्तन घडविणारे होते, हा मुद्दा रा. ना. चव्हाण यांनी अधोरेखित केला आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा आशय सुसंवादी होता. त्यांनी भौतिक घटकांच्या सोबत सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे भौतिक क्रांतिबरोबर सांस्कृतिक क्रांती या संकल्पनेच्या चौकटीत या पुस्तकाचा आशय उलगडत जातो.
– प्रा. डॉ. प्रकाश पवार
कोल्हापूर
Reviews
There are no reviews yet.