शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती एक प्रेरक समाज प्रबोधक व परिवर्तनकार

135.00

1 in stock

पुस्तकाचे नाव शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती एक प्रेरक समाज प्रबोधक व परिवर्तनकार
लेखक रा. ना. चव्हाण
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १७०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २१४ ग्रॅम

Description

शिवस्मरण कशासाठी ? शिवधोरण म्हणजे कल्याणकारी दृष्टी !

ज्यांना  राज्य व शासन चालवायचे आहे, त्यांना शिवरायांचे व्यक्तिमूलक गुण आकर्षक व उपयोगी वाटतील. काळ बदलत असला तरी नैतिक मूल्ये शाश्वत असतात व आज त्यांचा अभाव वाटतो. ज्या वेळेस अभाव भासतो त्यावेळी विशेषत: शिवरायांचे रूप आठवणे क्रमप्राप्त होते.

लोकशाही – समाजवाद व विकेंद्रीकरण यांच्या यशासाठी तरी शिवरायांचे व्यक्तिमत्व व गुणनिधिस्वरूप बारकाईने व अवधानाने पाहणे क्रमप्राप्त होय. त्याच्याकडे पाठ करून चालणार नाही. राजकारण हे समाजकारणासाठी व समाजस्वास्थ्यासाठी असते. जनतेचे संसार, प्रपंच चांगले व शांततेने चालण्यासाठी निकोप राजकारण करावे लागते. या दृष्टीने सामाजिक राजकारण शिवबांनी केले व स्वराज्याबरोबर सुराज्याचा अनुभव तमाम जनतेस प्राप्त करून दिला. या अनुभवाचा आज दुष्काळ आहे म्हणून शिवाजी चरित्र आजच्या संदर्भाने पुढे ठेवावे लागते. शिववर्णन करताना लेखणी धन्य होत असते. वाणी व आचरण शुद्ध होण्यास मदत होते. म्हणूनच हा उपक्रम बुद्ध्या करावा लागतो. शिवाजी चरित्रावर नव्या कालमानानुसार विवेक करणे प्राप्त होते.

श्री शिवकिरणे अंधाऱ्या काळात उजेड दाखवतील असा विश्वास आहे, श्रद्धा आहे.

“And yet we trust it comes from thee,

A beam in darkness : Let it grow.”

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती एक प्रेरक समाज प्रबोधक व परिवर्तनकार”

Your email address will not be published. Required fields are marked *