मुलांनो गाडा या अंधश्रद्धा

90.00

99 in stock

पुस्तकाचे नाव मुलांनो गाडा या अंधश्रद्धा
लेखक चंद्रसेन  टिळेकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७० ग्रॅम

Description

अंधश्रद्धा हा आपल्या समाजाला जडलेला एक जबरदस्त मानसिक रोग आहे. वरवर जरी या रोगाची लक्षणे दिसत नसली, तरी सामाजिक मन हतबल होत असल्याचे वारंवार निदर्शनाला येत आहे. फलज्योतिषाची चलती, मंदिरासमोरील प्रचंड रांगा, आणि तथाकथित साधू मंडळींच्या प्रवचनाला आणि त्यांच्या दर्शनाला होणारी अफाट गर्दी, ही सारी सामाजिक मनं खंगत चालल्याचीच लक्षणे आहेत. अशा सामाजिक मनात भव्य – दिव्य कल्पनांचा संचार होऊ शकत नाही.  ‘यत्न तो देव जाणावा’ या रामदासी उक्तीची कास धरण्याऐवजी, अंधश्रद्ध माणसे ‘दैवात असेल तसे होईल’ अशा निराशवादाचे भक्ष्य  बनतात.  प्रौढ व्यक्तींना अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करणे जरा अवघडच काम आहे.  लहान वयातच मुलांवर अंधश्रद्धा – निर्मूलनाचे संस्कार केले तरच भारताचे भावी नागरिक  विद्न्यान वादी  होण्याची शक्यता आहे.  त्या दृष्टीने श्री. चंद्रसेन  टिळेकर यांनी खास मुलांसाठी ‘गाडा या अंधश्रद्धा’ हे पुस्तक लिहून एक सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. श्री. चंद्रसेन  टिळेकर यांनी बुवाबाजी, भुतखेते,  गैरसमजुती, अंगात संचारणे, करणी वगैरे गोष्टींची मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत शास्त्रीय मीमांसा केली आहे.  खरे तर असे पुस्तक शाळा खात्याने पुरवणी वाचन म्हणून शालेय शिक्षणात प्रविष्ट करायला हरकत नाही.  तसे शक्य नसेल तर सर्व शाळांना या पुस्तकाची शिक्षण खात्याने शिफारस करावी, आणि मोकळ्या तासिकांना त्यामधील प्रकरणे वाचली जातील असे पाहावे . 

प्रा. मोहन आपटे   

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुलांनो गाडा या अंधश्रद्धा”

Your email address will not be published. Required fields are marked *